शिवगोरक्ष योगपीठ संस्थान

संस्थान संपूर्ण माहिती

श्री गुरू १००८ धर्माचार्य परमहंस संत श्री भगवान महाराज ठाकरे यांनी शिवगोरक्ष योगपीठाची कल्पना सन १९८७ साली श्री दत्त संप्रदायानुसार आपल्या आजोबांकडून वैकुंठवासी शंकरराव ठाकरे यांच्याकडून नवनाथ सोहम या मंत्राची दीक्षा घेतली व बालपणीच मुलाचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणीप्रमाणे धर्मसंस्कृतीचे आचरण करून आपली दिनचर्या चालविली. शालेय वयातच श्री हनुमानजींची भक्ती करून त्या काळात त्यांच्याकडे येणाऱ्या साधूंनी त्यांना दिव्यदृष्टीने पाहून हा बालक पुढे महान योगी होईल, असे भाकीत केले. त्याप्रमाणेच महाराजांनी दिलेल्या नियमांचा अपव्यय न करता रोज पहाटे प्राणायाम व योग करून आपला अभ्यास चालू ठेवला आणि खऱ्या अर्थाने चमत्कारावाचून नमस्कार नाही याचे फळ १९८७ सालापासूनच त्यांच्या जडीबुटीद्वारे अभ्यासाने गावातीलच बालमृत्यू सर्पदंशाने होणार यावर वनस्पतींचा वापर करून अल्प वयातच अनेकांचे प्राण वाचविले.

 ‘असाध्य ते साध्य करिता सायास । कारण अभ्यास तुका म्हणे ।।’ या अर्थाप्रमाणे शालेय शिक्षण, व्यावसायिक शिक्षण (आयटीआय) व त्याबरोबरच परमार्थाची भक्कम पकड. ‘सामर्थ्य आहे चळवळीचे । जो जो करील तयाचे ।। परि तेथे भगवंताचे । अधिष्ठान पाहिजे ।।’ या न्यायाने महाराजांनी हा त्रिवेणी संगम आत्मसात करून आपली परमार्थ दशेची वाटचाल अव्याहतपणे चालू ठेवली व १९८७ सालच्या अश्विन शु. प्रतिपदा ते अश्विन शु. दशमी (दसरा) या वर्षापासून नवरात्र अनुष्ठान, कुंडलिनी जागृतीद्वारे योगाभ्यास व प्राणायाम करण्याची अतिशय अवघड अशी विद्या प्राप्त करण्यास प्रारंभ केला.

सुरुवातीच्या काळात जेवढे शिष्य मिळतील त्यांच्यासमवेत किंबहुना फक्त ९ शिष्यांच्या समवेतच प्रतिवर्षी या नऊ दिवसांच्या काळात कुंडलिनी जागृती योगाभ्यास व प्राणायाम यावर विजय मिळवून त्यांच्यासमवेत असणाऱ्या नऊ शिष्यांचे कॅन्सर, टीबी व दुर्धर आजार यापासून मुक्तता केली.

महाराज या ठिकाणी न थांबता या साध्य झालेल्या कुंडलिनी जागृतीचा साक्षात्कार म्हणजेच ज्याला योगाविषयी काही माहिती नसेल त्यांनीदेखील त्यांनी सांगितलेल्या साध्या आसनात शुद्ध आहारविहार घेतला 

तर त्यांच्याकडून देखील अशाप्रकारच्या योगीकक्रिया करवून घेऊन सांधिवातापासून ते अनेक दुर्धर आजारापासून अशा शिबिर कालावधीत हजारो दुःखीपीडित बरे केले. याचा पुरावा म्हणून आजदेखील कोल्हापूर, सांगली, सातारा येथील प्रत्यक्ष व्हिडीओ फिल्मद्वारे असणाऱ्या क्रिया व शिस्तबद्ध पद्धतीने ३ बाय ३ चे एका व्यक्तीत अंतर ठेवून प्राणायाम व योग करवून घेतले व त्याचा परिणाम म्हणून तेथील जनतेने आपापले आजार कसे बरे झाले याची ग्वाहीदेखील दिली. याचेदेखील सबळ 

पुरावे योगपीठामध्ये अद्ययावत आहेत. जगाच्या पाठीवर जसे अनेक दानाचे प्रकार आहेत. त्या दानामधून दातृत्व असणारा दानशूर हा शेवटच्या क्षणापर्यंत दान करेलच याची व्यावहारिक नियमाने पूर्तता होऊ शकत नाही. म्हणजेच भूदान, सुवर्णदान, गोदान, अन्नदान यामध्ये देणाऱ्याचे कमी होतेच, परंतु ज्ञानदान हे असे कोठेही आळसपणा केला नाही व होण्यातून म्हणजेच जो स्वतः करता जगला ते जगणे नव्हे, परंतु जे जगाकरिता जगतात ते खरे. म्हणजेच दधिचीऋषींपासून अगस्तीऋषी असो या सर्वांनीदेखील आपापला देह उदाहरणार्थ देहदान करण्यापेक्षा तपश्चर्येमध्ये असताना इंद्रराजाने वज्र हे अस्त्र तयार करण्याकरता तपोनिधी, दधिचीऋषी यांच्या देहातील हाडांची मागणी केली व बहुउपयोगी येते म्हणून दधिचीऋषींनी तत्काळ समर्पित केली. ‘जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे’ या न्यायाने महाराजांनीदेखील ही असाध्य

 अशी योगाची अवस्था प्राप्त झाल्यानंतर जगतकल्याणाकरिता मोठ्या प्रमाणावर खर्ची करण्याचे ठरविले व काही दिवस सोमेश्वरवाडी गंगापूररोड, चेहेडी पंप अशाही ठिकाणी भाड्याने राहून आपली योगसाधना, प्राणायाम व आयुर्वेद जडीबुटीवर संशोधन हे आपला जीवन चरितार्थ स्वपायावर चालवून 

जनसेवा हीच ईश्वरसेवा किंबहुना जीव ब्रह्मसेवा हे तत्त्व स्वीकारून निरोगी, निरामय जीवनाचा यशस्वी आनंदमार्ग कसा अवलंबावा हे अनेक सर्वसामान्यांना शिकवून करवून घेऊन त्यातून अनेक व्यसनांपासूनदेखील महाराजांनी मुक्त केले. हिरा जसा कोणत्याही कोपऱ्यामध्ये असेल तरी तो चमकल्याशिवाय रहात नाही त्याप्रकारे महाराजांचे कार्य दिवसेंदिवस चमकू लागले व अशा थोर हिऱ्याची पारख एक रत्नपारखी नांदूरगावचे रहिवासी कै. गोपीनाथ मल्हारी पगार यांनी स्वतःच्या वाट्यातील १३ गुंठे जमीन अमृतधाम येथील हनुमाननगरमधील भूदान देऊन खऱ्या अर्थाने अशा श्री गुरूंना जगतकल्याणाच्या हेतूकरिता गुरूदक्षिणाच दिली आणि या अशा पवित्र ठिकाणी महाराजांनी निःस्वार्थ हेतूने किंबहुना करून अकर्ता राहणे ही संतांची खुबी लक्षात ठेवून स्वतःचे नाव न देता अशा •योगपीठाला ‘शिवगोरक्ष योगपीठ आयुर्वेद संस्थान’ हे नाव देण्याचा दृढसंकल्प केला.