संस्थान माहिती
श्री गुरू १००८ धर्माचार्य परमहंस संत श्री भगवान महाराज ठाकरे यांनी शिवगोरक्ष योगपीठाची कल्पना सन १९८७ साली श्री दत्त संप्रदायानुसार आपल्या आजोबांकडून वैकुंठवासी शंकरराव ठाकरे यांच्याकडून नवनाथ सोहम या मंत्राची दीक्षा घेतली व बालपणीच मुलाचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणीप्रमाणे धर्मसंस्कृतीचे आचरण करून आपली दिनचर्या चालविली. शालेय वयातच श्री हनुमानजींची भक्ती करून त्या काळात त्यांच्याकडे येणाऱ्या साधूंनी त्यांना दिव्यदृष्टीने पाहून हा बालक पुढे महान योगी होईल, असे भाकीत केले. त्याप्रमाणेच महाराजांनी दिलेल्या नियमांचा अपव्यय न करता रोज पहाटे प्राणायाम व योग करून आपला अभ्यास चालू ठेवला आणि खऱ्या अर्थाने चमत्कारावाचून नमस्कार नाही याचे फळ १९८७ सालापासूनच त्यांच्या जडीबुटीद्वारे अभ्यासाने गावातीलच बालमृत्यू सर्पदंशाने होणार यावर वनस्पतींचा वापर करून अल्प वयातच अनेकांचे प्राण वाचविले.
‘असाध्य ते साध्य करिता सायास । कारण अभ्यास तुका म्हणे ।।’ या अर्थाप्रमाणे शालेय शिक्षण, व्यावसायिक शिक्षण (आयटीआय) व त्याबरोबरच परमार्थाची भक्कम पकड. ‘सामर्थ्य आहे चळवळीचे । जो जो करील तयाचे ।। परि तेथे भगवंताचे । अधिष्ठान पाहिजे ।।’ या न्यायाने महाराजांनी हा त्रिवेणी संगम आत्मसात करून आपली परमार्थ दशेची वाटचाल अव्याहतपणे चालू ठेवली व १९८७ सालच्या अश्विन शु. प्रतिपदा ते अश्विन शु. दशमी (दसरा) या वर्षापासून नवरात्र अनुष्ठान, कुंडलिनी जागृतीद्वारे योगाभ्यास व प्राणायाम करण्याची अतिशय अवघड अशी विद्या प्राप्त करण्यास प्रारंभ केला.
सुरुवातीच्या काळात जेवढे शिष्य मिळतील त्यांच्यासमवेत किंबहुना फक्त ९ शिष्यांच्या समवेतच प्रतिवर्षी या नऊ दिवसांच्या काळात कुंडलिनी जागृती योगाभ्यास व प्राणायाम यावर विजय मिळवून त्यांच्यासमवेत असणाऱ्या नऊ शिष्यांचे कॅन्सर, टीबी व दुर्धर आजार यापासून मुक्तता केली.
योगपीठातील उपक्रमे
- वनौषधी रोग निवारण केंद्र
- वनौषधी अर्कयुक्त बाष्पस्नान
- अतिदुर्लभ शक्तीपात, दीक्षा शिबीरे
- अक्युप्रेशर, नैसर्गिक चिकित्सा
- योगसाधना व प्राणायाम शिबीर
- कुंडलिनी जागृती व आत्मसाक्षात्कार
- ज्योतिष मार्गदर्शन
- संपूर्ण बॉडी मसाज (मॉलीश)
- वास्तुदोष बाधा निवारण व मार्गदर्शन
- वनौषधींचे प्रयोग, संशोधन आणि संवर्धन
शिवगोरक्ष योगपीठातील निसर्ग उपचार आयुर्वेदिक वनोषधींच्या संयुक्त उपचाराने खालील रोगांचा नाश होतो.
डायबेटिस, गँगरीन, हार्टअँटेक, कोलेस्ट्रॉल रुग्णांसाठी नवसंजीवनी ठरलेली सिद्ध वनौषधी, हाडांचे व कंबरेचे दुखणे, संधीवात, आमवात, पॅरालिसिस, गाठीचे आजार बरे झाले. सोरायसीस, खाज खुजली, इसब सर्व प्रकारचे त्वचारोग समुळ नष्ट झाले. १ ते ३५ एम.एम.चे किडनी स्टोन विरघळून बाहेर पडले. दमा, खोकला, सर्दी, पडसे, फिटस्, टी.बी., ऑसिडीटी, थायरॉईड, वातरोग, काविळ, दात, डोळे, केसांचे विकार नाहिसे झाले. वजन घटविणे, वाढविणे, अशक्तपणा, मुळव्याध, फिशर, गॅस ट्रबल, पोटाचे आजार, बौद्धिक व शारीरिक कमजोरी, प्लेटलेस, किडणी, फेल्युअर यावर अनुभव सिद्ध इलाज होतात. सर्व उपचार करून जीवन जगण्यास हताश झालेले रूग्ण येथे बरे होऊन त्यांना नवजीवन लाभले.